About Us

ग्रामोन्नती मंडळ या शैक्षणिक संस्थेची स्थापना 1944 साली झाली. ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार व उपयुक्त शिक्षण मिळावे या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेत बालवाडीपासून उच्च शिक्षणापर्यंत मूलभूत शिक्षण, तंत्रज्ञान शिक्षण तसेच कृषि शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. संस्थेने के.जी. पासून पी.जी. पर्यंत शिक्षणाची संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली आहे. ही संस्था म्हणजे शिक्षण, ग्रामीण विकास आणि प्रगत तंत्रज्ञानाचा सुरेख संगम आहे. संस्थेचे एकूण २० विभाग असून त्यापैकी संस्थेची एक शाखा म्हणजे ग्रामोन्नती मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय ( बी.एड.) नारायणगाव.

ग्रामीण भागातून सुद्धा शिक्षण देणारे शिक्षक घडले जावेत हा उद्देश उराशी बाळगून संस्थेने शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची स्थापना केली. खेड्यापाड्यात शिक्षण शास्त्र महाविद्यालयांचा अभाव असल्यामुळे मुलांना पुणे, मुंबई सारख्या शहरात जावे लागत होते. परंतु शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची स्थापना केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या निश्‍चितच कमी झाल्या.

महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये :

  • भव्य इमारत

  • आधुनिक सुविधा

  • समृद्ध ग्रंथालय

  • अत्याधुनिक संगणक कक्ष

  • इंटरनेटची सुविधा

  • विविध उपक्रमांचे आयोजन

  • अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद

  • मानसशास्त्रीय प्रयोगशाळा

  • विषयनिहाय स्वतंत्र वर्गखोल्या

  • प्रशस्त अध्यापन ( व्याख्यान ) कक्ष

  • सांस्कृतिक हॉल

  • क्रीडा कक्ष

  • प्रशस्त मैदान

  • स्वच्छतागृह

  • पिण्याचे पाणी इ.

बोधवाक्य -

  • उज्वल भविष्यासाठी दर्जेदार शिक्षक शिक्षण

मिशन -

नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, सर्जनशील अध्यापन, सकारात्मक विचारसरणी, तांत्रिक ज्ञानासह संशोधन वृत्ती, जीवन कौशल्य आणि सामाजिक जागरूकता यावर आधारित विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे.