ग्रामोन्नती मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय

वारुळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे, पिन नं. 410504

संपर्क क्रमांक : 9322362054,

इ-मेल : gramonnatimandal.bedcollege@gmail.com

बी.एड. प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कार्यशाळा

ग्रामोन्नती मंडळाच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संपन्न

ग्रामोन्नती मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे या महाविद्यालयामध्ये रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्र शासनामार्फत बी.एड. प्रवेशासाठी अनिवार्य केलेल्या सीईटी प्रवेश परीक्षासंदर्भात एक दिवशीय उद्‍बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेमध्ये बी.एड. प्रवेश प्रक्रिया, परीक्षेची पूर्वतयारी, अभ्यासक्रमातील मानसिक क्षमता, सामान्य ज्ञान आणि शिक्षक अभियोग्यता या घटकांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामोन्नती मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. प्रकाश पाटे, मा. कार्याध्यक्ष कृषीभूषण श्री. अनिलतात्या मेहेर, मा. कार्यवाह श्री. रविंद्र पारगावकर, अन्य सन्माननीय पदाधिकारी, सदस्य, तसेच महाविद्यालयाचे मा. अध्यक्ष श्री. रमेश जुन्नरकर यांच्या मार्गदर्शनान्वये महाविद्यालयातील उपप्राचार्या डॉ. रविशा टाक, प्रा. सुनिता पाटोळे, प्रा. शरद तरटे, प्रा. वैभव खराडे व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सदर कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडली. या कार्यशाळेस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. राहूल गोंगे यांचेही अनमोल मागदर्शन लाभले. या कार्यशाळॆचा लाभ परिसरातील नव्याने शिक्षक होऊ पाहणार्‍या अनेक विद्यार्थ्यांनी घेतला.

मार्गदर्शन करताना प्रा. शरद तरटे व सहकारी

उपलब्ध कोर्स -

  1. बी. एड.

  2. डी. एस. एम.

बी.एड.प्रवेशप्रक्रिया -

  • बी.एड.अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र शासन केंद्रिय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया आयोजित करते. याशिवाय बी.एड.ला प्रवेश मिळत नाही.

  • यास्तव शासनामार्फत केंद्रिय पातळीवर ऑनलाईन परीक्षा घेतली जाते.

  • प्रवेशासाठीची सी.ई.टी. परीक्षेची जाहिरात साधारणपणे एप्रिल महिन्यात प्रमुख वर्तमानपत्रातून दिली जाते.

  • इच्छुक विद्यार्थ्यांनी मुदतीमध्येच सी.ई.टी. परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असतो.

  • ज्यांनी महाविद्यालयात यापूर्वीच नावनोंदणी केली असेल त्यांना याबाबत संबंधित सूचना दिल्या जातात.

  • सी.ई.टी.परीक्षा साधारणपणे मे महिन्यात विद्यार्थ्यांनी निवडलेल्या केंद्रावर आयोजित केली जाते.

  • सी.ई.टी.चा निकाल साधारणपणे मे-जून मध्ये लागतो.

  • बी.एड.प्रवेशासाठी सी.ई.टी. Application Form पी.डी.एफ. स्वरुपात, हॉलतिकिट तसेच निकाल (स्कोर कार्ड) या तिन्ही बाबी आवश्यक असतात.

प्रवेश प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे असतात.

  1. ऑनलाईन अर्ज करणे

  2. परीक्षेपूर्वी हॉलतिकीट ऑनलाईन पद्धतीने काढून घेणे

  3. सी.ई.टी. परीक्षा देणे

  4. निकालाची प्रिंट घेणे

  5. डी.एच.ई. चा फॉर्म भरणे

  6. ऑप्शन फॉर्म भरणे

  7. पहिला राऊंड

  8. दुसरा राऊंड

  9. तिसरा राऊंड

  10. फॉर्म अद्ययावत करणे

  11. स्पॉट राऊंड

संपर्क :-

१] प्राचार्य डॉ. गोंगे आर. बी. ( 9850091643 )

२] उपप्राचार्या टाक आर.डी. ( 8830972872 )

] प्रा. तरटे एस. के. ( 9518957009 / 9822325653 )

] मेहेर रेश्मा ( 9309733448 )

https://meet.google.com/ctn-pqrb-wyx

वरील लिंकला क्लिक करुन आपल्या संविधानाविषयी परिपूर्ण माहिती समजून घेण्याची संधी.....

26 नोव्हेंबर 2021 " संविधान दिन ” : व्याख्यान,

व्याख्याते :- डॉ. राहूल गोंगे, प्र. प्राचार्य, ग्रामोन्नती मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय नारायणगाव.

Friday, November 26 · 2:30 – 3:30pm

स्थानिक व्यवस्थापन समिती ( LMC )

मा. रमेश नारायण जुन्नरकर, चेअरमन
मा. प्रकाश विठोबा पाटेसदस्य
मा. अनिल घमाजी मेहेरसदस्य
मा. रविंद्र गजानन पारगावकर, सदस्य
मा. अल्हाद भीमराव खैरे, सदस्य
श्री.शशिकांत भिमाजी वाजगे, सदस्य
श्री.ऋषिकेश अनिल मेहेर, सदस्य
डॉ.राहूल बाळकृष्ण गोंगे, प्राचार्य